फलटण वासी वर आपले स्वागत आहे
 

 Home  | सभासद माहिती | प्रतिक्रिया | पूर्वपीठीका | स्मृतिगंध | जाहिरात | जोडणी | महिन्याचे खास छायाचित्र | वर्षाचे पंचांग | Contact us


पूर्वपीठीकl

 
श्री. रघुनाथ नरहर तेरेदेसाई एक  आदर्श शिक्षक या नात्याने त्यांनी आपला उमेदीचा  काळ  मुधोजी हायस्कूल व फलटणच्या  परिसरात व्यतीत केलेला आहे. त्या फलटणमधील  मंतरलेल्या  दिवसाची आठवण काढावी या विचारांनी ते प्रेरीत झाले व श्री. गजानन गोडबोले, श्री. अशोक गोडबोले, श्री. स. गो. पटवर्धन, सौ. लीलाताई कमलापूरकर, श्री. राजाभाउ आठवले, श्री. मधुकर बावडेकर या समविकारी मंडळींसह  श्री. रा. न. तेरेदेसाई यांनी फ़लटणवासीयांचा पहिला मेळावा २ आँगस्ट १९९८ रोजी संपन्न केला. विवेकानंदा हॉँल मध्ये आयोजित केलेला मेळावा संस्मरणिय व आदर्श ठरला. या समारंभाचे अध्यक्षस्थान श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी भूषविले होते. तेव्हापासून फलटणवासीय मेळाव्याचे हे रोप नव्या जोमाने वाढत  जाऊन आज त्याचां मोठा वृक्ष  बहरला आहे असे दिसते. त्याच्या फांद्या पुण्यात मर्यादित न राहता फलटणपर्यंत पोहोचल्या आहेत.
 
फलटणवासीयांचा वार्षिक  तिसरा मेळावा १२ जानेवारी २००२ रोजी श्री गणेश सभागृह, पुणे ४ येथे संपन्न झाला. त्यावेळी नवनवीन उपक्रम सुरू करता यावेत या दृष्टीने कायम निधी जमवावा असा विचार मांडला गेला. नंतर  ११-१०-२००२ रोजी फलटण, जिल्हा सातारा येथील रहाणा-या व पूर्वी राहिलेल्या व फलटणबद्दल आत्मीयता, आपुलकी असलेल्या व्यक्तींची सभा पुणे येथे भरली होती व त्या सभेत फलटण येथील रहाणा-या / राहिलेल्या व्यक्तींमध्ये अधिक  जवळीक निर्माण होवून त्यांच्या मधील परस्पर संबंध - विचारांची देवाण -घेवाण सामंजस्य दृढ व्हावे असे मत प्रदर्शित करण्यात आले होते त्यावर साधक - बाधक चर्चा  होवून सर्वांच्या मताने सदरील मुख्य उद्देशाच्या पूर्तीसाठी एक सार्वजनिक न्यास स्थापण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला व सदरील मानसाप्रमाने सर्वश्री शारदा वामन कोळेकर, सुधाकर शंकर फौजदार व रघुनाथ नरहर तेरेदेसाई यांनी रू. ५०१ प्रत्येकी सदरील उद्देशासाठी देवून सार्वजनिक न्यास स्थापून उद्देशापूर्तीसाठी सक्रीय देणगी देण्याचे मान्य केले.
सदरील न्यास स्थापन करणारे व सर्वश्री १) र. न. तेरेदेसाई, २) वि. म. रानडे, ३) मनोहर स. जोशी, ४) मधुकर ना. बावडेकर, ५) सुधाकर शं. फौजदार, ६) राम ग. कुलकर्णी, ७) डॉ. सौ. शालिनी विश्र्वास भोसले, ८) श. वा. कोळेकर आणि विजय वि. भिडे या सर्वांनी सदरील न्यासाचे प्रथम विश्र्वस्त म्हणून काम करण्यास व उद्देशापूर्तीसाठी निःस्वार्थ सेवा देण्यास संमती दिली व फलटणवासीय कल्याणनिधी हा न्यास निर्मितीसाठी वरीलप्रमाणे मिळालेले रू. १५०३ श्री. विजय भिडे यांचेकडे सुपूर्त करण्यात आले. 
दि. २५-११-२००२ रोजी न्यासाचे सर्व कागदपत्र ट्रस्ट डीड, संमती पत्र, वगैरे गोष्टींची तरतूद - तयारी करून अर्ज धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात दाखला केला. या कामात श्री. विजय भिडे यांना श्री. श्रीपाद नरवणे यांनी उस्त्फुर्त प्रतिसाद देऊन मदत केली. दिनांक ०९-०७-२००३ रोजी न्यासास मंजूरी मिळाली. "फलटणवासीय कल्याणनिधी" या न्यासाला नोंदणी  क्रमांक ई ३८१९ (पुणे) देण्यात आला.
न्यासाचे उद्देश :
सदरील न्यासाचे उद्देश खालीलप्रमाणे असतील.
४अ) फलटणमध्ये जन्मलेले किंवा फलटणमध्ये काही काळ व्यतीत केलेले तसेच फलटणबद्दल आस्था असलेले वा सध्या फलटणमध्ये किंवा बाहेरगांवी रहाता असलेल्या नागरीकांचा एकमेकांशी संपर्क रहावा, पूर्व स्मृतींना  उजाळा मिळावा वा यासाठी दरवर्षी  / दर दोन वर्षांनी  पुण्यामध्ये किंवा शक्य झाले तर फलटण किंवा इतर ठिकाणी स्नेहसंमेलन भरवणे.
 
९) विजया विनायक भिडे, वय वर्षे : ६५, व्यवसाय : निवृत्त, १९ राधाकृष्ण, पौड रोड, पुणे ४११ ०३८
न्यासाचे विश्र्वस्त दुसर्या  बाजूला
 
या सर्वांनी सदरील सार्वजनिक न्यासाचे प्रथम विश्र्वस्त म्हणून काम  करण्यात व उद्देशपूर्तीसाठी निस्वार्थ सेवा देण्यास  संमती दिली आहे, हे सर्व दुसर्या बाजूला असून त्यांच्या मध्ये ह्या सार्वजनिक न्यासासंबंधी  खालीलप्रमाणे अटींवर करार होवून न्यासासाठी डीड जाहीर करून न्यासनिर्मितीसाठी व त्याच्या पुढील व्यवस्थापनासाठी एकमत झाले आहे;
आणि ज्याअर्थी आज दि. ....... २००२ वार  ........ रोजी पुणे येथे सर्वश्री १) मनोहर सदाशिव देशपांडे २) सुधाकर शंकर फौजदार ३) रघुनाथ नरहर तेरेदेसाई पहिली बाजू ह्यांनी प्रत्येकी रू. ५०१/- असे एकूण रू. १५०३ वरील प्रमाणे,
दुसर्या बाजूचे विश्र्वस्त सर्वश्री १) रघुनाथ नरहर तेरेदेसाई २) विद्यानंद महादेव रानडे ३) मनोहर सदाशिव जोशी ४) मधुकर नागेश बावडेकर ५) सुधाकर शंकर फौजदार ६) राम गणेश कुलकर्णी ७) डॉ. सौ. शालिनी विश्र्वास भोसले ८) शारदा वामन कोळेकर व ९) विजय विनायक भिडे यांचेकडे न्यासासाठी सुपूर्त केले आहेत व दुसर्या बाजूकडून स्वीकारले आहेत. व त्यांच्यामध्ये वरील दिवशी खालीलप्रमाणे करार झाला आहे तो करार खालीलप्रमाणे :-
 
१) सार्वजनिक न्यासाचे नाव : सदरील न्यासाचे नाव "फलटणवासीय कल्याणनिधी" असे राहील. सदरील न्यास या पुढे त्याच  नावाने संबोधला व ओळखला जाईल.
२) सार्वजनिक न्यासाचा पत्ता : सदरील न्यासाचा सध्याचा पत्ता -
द्वारा श्री. मनोहर सदाशिव जोशी, पिनाक गार्डन, कोकण एक्स्प्रेस हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे ४११ ०२९ असा असेल. मात्र सदरील न्यासाची स्थावर मालमत्ता विकत घेतली वा भाड्याने घेतली तर पत्ता त्या ठिकाणी ठेवावा. सध्याचा पत्ता काही ठिकाणी बदलावा लागला तर तो बदलण्याचा अधिकार विश्वस्तांना असेल मात्र त्यांनी तसा ठराव बहुमतांनी करावा. पत्ता बदलल्यास सर्वांना व संबंधित शासकीय अधिका-यान विश्र्वस्तांनी  कळवावा.
३) न्यासाचे कार्यक्षेत्र : कार्यक्षेत्र प्रामुख्याने व अग्रक्रमाने संपूर्ण महारास्त्र राज्य राहील, मात्र आवश्यकतेनुसार उर्वरीत भारतातील  सर्व वा कोणत्याही राज्यात सर्व विश्वस्ताना एकमताने कार्यक्षेत्र वाढविता येईल.
४) न्यासाचे उद्देश : सदरील सार्वजनिक न्यासाचे उद्देश खालीलप्रमाणे असतील.
४अ) फलटणमध्ये जन्मलेले किंवा फलटणमध्ये काही काळ व्यतीत केलेले तसेच फलटणबद्दल आस्था असलेले व सध्या फलटणमध्ये किंवा बाहेरगावी रहात  असलेल्या नागरीकांचा एकमेकांशी संपर्क रहावा यासाठी दरवर्षी  / दर दोन वर्षांनी पुण्यामध्ये किंवा शक्य झाले तर फलटण किंवा इतर ठिकाणी स्नेहसंमेलन भरवणे.
४ब) फलटणमध्ये किंवा फलटणबाहेर (कलम क्र. ४अ संदर्भ) सध्या शिकत असलेल्या गुणी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारीतोषीक देणे तसेच त्यांचा  सत्कार करणे, प्रोत्साहन देणे.
४क) फलटणवासीय सदस्यांनी अथवा त्यांच्या पाल्यांनी शिक्षण, विज्ञान, वांग्मय, कला ज्ञानाचा प्रसार व प्रचार, सामाजिक कार्य, पर्यावरण, या सारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा सत्कार करणे.
४ड) नैसर्गिक आपत्ती आल्यास अथवा राष्ट्रीय आपत्ती आल्यास शक्य तेवढी मदत करणे.
४ई) काही कारणाने शिक्षणास वंचित  झालेल्या फलटणवासीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे/ मदत मिळवून देणे वा मिळण्यास मदत करून स्वतःच्या पायावर उभे राहून, स्वतंत्र उद्योग / व्यवसाय करण्याची क्षमता, आत्मविश्र्वास, प्रेरणा निर्माण करण्यास सहाय्य करणे.
४ऊ) आजारी स्त्री वा पुरूष व्यक्तीला रोग निवारण्यासाठी मदत करणे.
४ए) रक्तदान शिबिरे तसेच आरोग्य विषयक  शिबिराचे आयोजन करणे.
४ऐ) वरील  अनुषंगाने उद्देशपूर्तीसाठी कार्यक्रम आखणे पार पाडणे.
 
५) वापरलेल्या शब्दांच्या व्याख्या : १) "सदरील न्यास" म्हणजे फलटणवासीय कल्याणनिधी
२) विश्र्वस्त म्हणजे ह्या तर Trust डीड प्रमाणे नेमलेले, वेळोवेळी कार्यरत असलेले विश्र्वस्त.
३) विश्र्वस्त मंडळ म्हणजे कार्यरत सर्व विश्र्वस्तांचे मंडळ
४) अधिनियम म्हणजे मुंबई सार्वजनिक न्यायासाठी महाराष्ट्र राज्यात लागू असलेला त्या त्या वेळचा कायदा.
५) निधी म्हणजे न्यासाचे सुरूवातीचा निधी व त्यामध्ये वेळोवेळी होणारी वाढ, आय व्यय यातील अधिक्य व सदरील न्यास उद्देशासाठी उभारलेले वेगवेगळे निधी
६) हिशोबाचे वर्ष म्हणजे दरवर्षी १ एप्रिल ते पुढील ३१ मार्चं पर्यंतचा बारा महिन्याचा कालावधी.
७) सदरील न्यासाचे सभासद म्हणजे ह्यातीला तरतुदीप्रमाणे नोंदलेले स्त्री / पुरुष व्यक्ती.
 
(६) सभासद व त्यासंबंधी :
१) सदरील न्यासाच्या उद्देशांवर निष्ठा असलेल्या सर्वांना जे १८ वर्षावरील अशा स्त्री पुरूषांना व जे फलटण येथील आजी माजी रहिवाशी असतील वा ज्यांची वा ज्याच्या कुटुंबियांची स्थावर मालमत्ता फलटण येथे असेल अशा सर्वांना सदरील न्यासाचे सभासद होण्याचा अधिकार असेल अशा सर्वांना विश्र्वस्तांकडे तसा अर्ज करावा व आवश्यक ती वर्गणी सदरील न्यासाकडे जमा करावी. सभासदत्व देणे वा न देणे हे विश्र्वस्त मंडळाच्या अखत्यारीत असेल.
 

Copyright Phaltan Vasi 2010
Website designed and developed  by Kalpak Solutions