फलटण वासी वर आपले स्वागत आहे
 

 Home  | सभासद माहिती | प्रतिक्रिया | पूर्वपीठीका | स्मृतिगंध | जाहिरात | जोडणी | महिन्याचे खास छायाचित्र | वर्षाचे पंचांग | Contact us


Home
 
सातारा जिल्ह्यातीला पूर्वाश्रमीचे फलपत्तन नगरी म्हणजेच  आजचे फलटण होय. सामाजिक, राजकीय, धार्मिक सांस्कृतिक  व शैक्षणिक परंपरेने सर्वार्थाने पुण्यनगरी म्हणून प्रसिद्ध असणारे केंद्रस्थान  होय. कै.  श्रीमंत सगुणामाता आईसाहेब  महाराज,  कै. श्रीमंत मुधोजीराजे mahaaraaj, कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक  निंबाळकर  महाराज  यांच्या कर्तुत्व समपन्नतेने व प्रभू श्रीरामचंद्र सदगुरू हरीबुवा महाराज, सदगुरू उपलेकरकाका आदींच्या  पावानास्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी. अशा नगरीत वास्तव्य करणे वा चाकरी करणे हे सर्वांनाचा आनंदाचे  व अभिमानाचे आहे.

याचा सार्थ अभिमान उराशी ठेवूनच  फलटण  नगरीत अनेक वर्षे  वास्तव्य केलेल्या पण कालांतराने कर्तव्यकर्मभूमी म्हणून इतरत्र सातत्याने सेवाकालात  भ्रमण केलेल्या सर्वांनी एकत्र येउन  "फलटणवासीय कल्याण निधि" ही संस्था स्थापित केली. फलटण मधील वास्तव्य व सहवास अत्यंत अलौकिक वर्णनाचा असल्याने तोच स्नेह, जिव्हाळा जोपासून फलटण मधील व आजूबाजूच्या भागातील सर्वसामान्यांना व इतरेजनांना आमच्या कृतिकार्यातून  काही प्रमाणात योगदान द्यावे हा मनातला संकल्प. यासाठी प्रारंभी सर्वश्री
 
आदींनी विचारमंथन करून ध्येय धोरण निश्चित केले. सातत्याने बारा वर्षे हा कार्ययज्ञ सुरू आहेच.
मात्र आता जुन्या बरोबरच नव्या दमाच्या नव्या पिढीलाही यात सामावून घेऊन अत्यंत हिरीरीने उत्तुंग गरूडझेप घेण्याचा  मानसं आहे.
 
फलटण शहरातील वा संपूर्ण तालुक्यातील  विविध शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थांमधील  मुलामुलि साठ पुण्यासारख्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित  सुविधा, मार्गदर्शक शिबिरे, सेमिनार, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा करीता मार्गदर्शक विविध भाषा वर्ग, परदेशात जाण्याची तयारी, नवनवीन लघुउद्योग, त्याचे बारकावे आदीबाबत  सखोल मार्गदर्शन करण्याची "विनामूल्य सेवा'" देण्याची तयारी आम्ही केली आहे. पुण्यात स्थित असलेल्या परंतु विविध क्षेत्रात धडाडीने काम करणा-या तरुणांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मनातील प्रामाणिक हेतू हा की, आपले फलटण सर्वार्थाने प्रगल्भ व विकसित व्हावे व नवी दिशा मिळावी. यासाठी शासकीय, निमशासकीय, जागतिक स्तरावर काम करणा-या लायन्स, रोटरी जायन्टस यासारख्या विविध संस्था संघटनांचे सहकार्याचे असंख्य हात मदतीसाठी पुढे येणार आहेत.
 
आपणांस नम्र विनंती की, आपण या कार्यात आपले योगदान देण्यासाठी फलटणवासीय कल्याणकारी संघाचे सभासद व्हावे, तन, मन, धन देऊन या सामाजिक 'यज्ञकुंङात' आपणही दान देऊन उपकृत  करावे ही नम्र विनंती.
 

 


View Photo Gallery

Events

फलटणवासीयांचा मेळावा
22nd Jan 2012

Download Details 

महिना / दिनांक - जाने. ११
फलटणवासीयांचा मेळावा
 
२६ जानेवारी
प्रजासत्ताकदिन
 
१५ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिन
रामनवमी - पारंपारिक संस्थानी उत्सव
बैल पोळा

more details


 

Copyright Phaltan Vasi 2010
Website designed and developed  by
Kalpak Solutions